ज्याच्या मनात तुमच्या बद्दल वाईट विचार आहेत
जो कधीच तुमच्या मदतीला आला नाहीं
त्याच्या बद्दल पण चांगले विचार करणं
हेच माणुसकी आहे
पराभवाचा शोक करू नका,विजयापूर्वी आनंद साजरा करू नका,तुमचे हेतू जाहीर करूनगोंधळ करू नका.
***
जो माणूस तुम्हाला एकदा फसवू शकतो,
तो दुसऱ्यांदाही तुम्हाला फसवेल...
संयम आणि वाट पाहणे
हे माणसाचे सर्वात मोठे धाडस आहे
पहिलं स्वतः पहा, स्वतः ऐका, समजा
आणि नंतर कोणासाठी काहीतरी बोला
या वेब पेजचे हिंदीमधे भाषांतर करा
या वेब पेजचे इंग्रजीमधे भाषांतर करा
जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखा समाधानाने जगा
उद्या मरून जायचे आहे
जीवंत आहोत हेच पुरेसे आहे
दिवसातून दोन वेळचे जेवण
आणि जीवनात शांती महत्वाची आहे
एखाद्याला समजून घ्यायचे असेल तर त्याचे हृदय समजून घ्या.कधी कधी एखादी व्यक्ती जे बोलू इच्छित नाही ते बोलते.
जो सुंदर असतो
तो कुरुपांना कुरूप म्हणत नाही
माणसाने स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे
कुणला दाखवण्यासाठी नाहीं
स्वतःसाठी चांगल असल पाहिजे
जो व्यक्ती स्वतः हा खुश राहू शकत नाही
तो कोणालाही खुश ठेऊ शकत नाही
लोभामुळे त्रास मिळतो छोट्या छोट्या चुकांमुळे दुःख मिळते हृदय आणि जीभ कोणतीही कसर सोडत नाहीत व्यसन मारून टाकते
सर्वांना समजा आणि शांत राहा
कोणी कमी कोणी जास्त मिळवतो
महान तो आहे जो त्याग करतों
कृतज्ञ राहा पण उपकार करू नका
विस्मरणशील राहा पण देव बनू नका
जगा आणि जगू द्या
स्वतंत्र राहा आणि राहू द्या
जीवन ही एक संधी आहे
फक्त आनंदी राहा
स्पर्धा नाही
फक्त स्वतःकडे पहा
जर खोटे चांगल्यासाठी बोलले तर ते सत्यापेक्षा हजार पटीने चांगले असते
आणि दुसरे खोटे म्हणजे ते सांगून
आपण स्वतःला आणि इतरांना फसवतो
लोक तुमच्यावर हसतील
ते तुम्हाला वेडा म्हणतील
कोणालाही सांगू नका
तुम्ही त्रासात आहात ते
ते तुमची चेष्टा करतील
एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असो वा नसो
त्याच्या शब्दात गोडपणा असावा
त्याच्या शब्दात सत्य आणि शुद्धता असावी
प्रेम हे सौंदर्यावर नाही
गुणांवर असते
ज्याच्यामध्ये चांगले गुण नसतात
तो मनातून उतरतो
दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानला पाहिजे
दुखी नाहीं
द्वेष वाईट गोष्टींसाठी असल पाहिजे
दुसऱ्यांच्या क्षमतांसाठी नाही
व्यक्ती स्वतःची किंमत स्वतः कमी करतो
प्रत्येक वेळी आणि सर्वत्र जास्त बोलून
सल्ला फक्त त्याच व्यक्ती ला द्या
जो तुमची कदर करतों
कुणाला तेवढंच द्या
ज्याला जितकी गरज असते
दुःख सर्वांनाच असतं
कोणाला कमी कोणाला असतं
घेतल तर खुप नाही घेतलं तर काहीच नसतं
पुढे जा आणि स्वीकार करा
बदल निश्चित आहे, शांत रहा
जगातील सर्वात गोड आणि विषारी फळ
एक गैरसमज आहे
स्वप्ने इतकी मोठी असावीत की
ती पूर्ण करण्यासाठी वेळ आणि आयुष्य
कमी वाटले पाहिजे
आपली वेळ चांगलीं आहे
याचा अर्थ असा नाही की
तुम्हीं कोणा सोबत पण कसही वागाल
वेळ प्रत्येकाची बदलते
गरज कोणाला कोणाचीही पडू शकते
जर एखाद्या वाईट गोष्टीचा नाश करू शकत नसाल
तर एका चांगल्या गोष्टीची सुरुवात करा
तुम्हीं प्रयत्न करा
देव कुणाला तरी पाठवतो
तुमच्या मदतीसाठी
अपमान पण झाला पाहिजे
लाज पण वाटली पाहिजे
पुढे जाण्यासाठी
आग पण लागली पाहिजे
जास्त नाहीं तर कमी
पापी प्रत्येक मनुष्य आहे
जो लाजला तो खरा आहे
गोड बोलून दूर गेलेल चांगलं
कोणाशी वाद करण्या पेक्षा
एका सुखी व्यक्तीला दुसऱ्या दुखी व्यक्तीची कदर नसते
तुम्ही कोनासरखे पण नाही
तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहत
तुम्ही तुमची तुलना
कोणाशीही करू नका
स्तुती, बक्षीस आणि नाव हे व्यवसाया मध्ये असतात
मदतीच्या बदल्यात या अपेक्षा करणे चांगले नाही
काही समस्यांवर उपाय म्हणजे शांतता
कारण तुम्ही जितके जास्त बोलाल तितके तुम्ही अडकून पडाल
***
जिथे शंका असते तिथे समजूतदारपणा नसतो
जिथे समजूतदारपणा नसतो तिथे प्रेम नसते
जेव्हा कोणी मला दुखावते
तेव्हां दुखावत नाही
माझ्या स्वतःच्या चुकांसाठी मला शिक्षा करतो
आणि मी कोणालाही दोष देत नाही
मी माझ्या चुका सुधारतो
सत्य माणसाचे शब्द कमी करते
काहीतरी विसरले जाईल
काहीतरी हिरावून घेतले जाईल
माणूसही मातीचा बनलेला आहे
एक दिवस तो मातीत विलीन होईल
स्वतः हा करा, स्वतः हा ला दोष द्या
विनोद बनायचे असेल, तर स्वतःहा चुका करा
स्वतः हा स्वतः हा ला इजा द्या , स्वतःहा भरा
तक्रार करायची असेल, तर स्वतःहा स्वतः हा ला करा
स्वतःहा कमकुवत बना, स्वतःहा बुडून मरा
विनोद फक्त त्याच व्यक्तीशी करा जो विनोद सहन करतो...
जो इतरांशीही विनोद करतो.
मन छोट करण्याची सवय गरिबांना असते,
आनंद वाटून जो निघून जातो तो राजा असतो!
जर वेळ वाईट असेल तर शांत राहा
हारणाऱ्याला टोमणे ऐकावे लागतात
तुम्ही जे साध्य करण्याचा प्रयत्न करता
ते तुमचे कर्म असते
तुम्हाला जे मिळेल ते तुमचे नशीब असते
शक्य असेल तर त्या व्यक्तीला जाऊन विचारा
ज्याने चूक केली आहे
एखाद्याचे नाव बदनाम करणे चांगले नाही
कोणाबद्दल जास्त विचार करू नका
त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते
जे नाते योग्य नाहीत ते तोडा
जिथे तुम्हाला आदर मिळत नाही
ती जागा सोडा
जे सहज मिळते ते कठीण काळात गमावू नका
आणि जे कठोर परिश्रमा नंतर मिळते
ते सहज गमावू नका
मस्करी एका मर्यादेपर्यंत ठीक आहे
एक चुकीचा प्रयत्न
मोठ्या संकटाकडे नेतो.
जर शरीर निरोगी असेल तर सर्व काही आहे
आरोग्याशिवाय तुम्ही असहाय्य होता
तुमचे गुपित कोणालाही सांगू नका
कोणालाही नाही
तुमच्या पाठीवर कोण थोपटतो हे महत्वाचे आहे
तुमच्या खांद्यावर कोणाचा हात आहे हे महत्वाचे आहे
तुमच्याशी कोण हात मिळवतो हे महत्वाचे आहे
तुमच्यासोबत कोण चालतो हे महत्वाचे आहे
आपण सर्वजण चुका करतो
आपण ते स्वीकारले पाहिजे...
न बोलल्याने प्रेम कमी होत नाही
जास्त बोलल्याने प्रेम वाढत नाही
आपण आपल्या पालकांच्या आणि मोठ्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नये
एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण त्या व्यक्तीचे सौंदर्य वाढवते
तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला नाही
सर्व काही ठीक आहे
तुम्ही अजूनही काहीतरी किंवा दुसरे शिकत आहात
जे उद्या उपयोगी पडेल
एखाद्याबद्दल वाईट बोलून
आपण स्वतःसाठी एक शत्रू निर्माण करतो
आणि एखाद्याच्या मनात द्वेष निर्माण करतो
प्रत्येकजण आनंदी राहू इच्छितो
पण कोणीतरी स्वत: हा आनंदी राहू इच्छितो
आणि एखाद्याचे आनंद दुसऱ्याला आनंदी ठेवण्यात आहे
जो व्यक्ती आदर करण्याच्या योग्य असतो
त्या व्यक्तीला इतरांकडून आदराची इच्छा नसते
जे दिसते ते सौंदर्य नसते
सौंदर्य आपल्या नजरेत असते
एखाद्याच्या हृदयात स्थिरावण्यासाठी खूप वेळ लागतो पण खाली उतरण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो
तुमचे काम पूर्ण होत नाही
जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यावर सोडता
जर तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल
तर विचार करा की कोणीही तुम्हाला मदत करायला येणार नाही
तुम्हाला कोणीही कमकुवत करू शकत नाही
कारण लढण्याचे धाडस आणि आत्मशक्ती तुमच्या आत असते
पुण्य हे कमावण्याची गोष्ट नाही
पुण्य म्हणजे स्वार्थाशिवाय एखाद्याला मदत करणे
तुम्ही दुःखी असणे चांगले नाही
जेव्हा तुम्ही एखाद्याला दुखावता तेव्हा ते खूप वाईट असते
जो माणूस खिशातून शेवटची नोट काढतो
तो गरीब नसतो
शब्द जोपर्यंत हृदयात असतात
तोपर्यंत सुरक्षित असतात
जर ते बाहेर पडले तर सांगता येत नाही
किती दूर जातील
माणूस स्वतःचा शत्रू असतो,
आणि राग हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो.
मस्करी करणे चांगले असते
पण कोणाच्या तरी कमकुवतपणावर नाही
ज्यांच्या घरचं पाणी पण पिलो असेल ना
त्यांना धोका देऊ नये
स्वाभिमान हाच सर्वस्व आहे
जिथे स्वाभिमान नाही तिथे काहीही आवश्यक नसते
देवाची भक्ती असो किंवा पालकांची सेवा असो,
दोघांमध्ये काहीही फरक नाही
तुमचे दुःख सर्वांना सांगू नका,
तुमच्या दुःखात कोणीही भागीदार नाही
आयुष्यात कधीही अशी चूक करू नका
ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला त्रास होतो
जर एखादी व्यक्ती सुंदर नसेल तर काय झालं
ती आतून मनाने पण तसेच बाहेरूनही स्वच्छ असायला पाहिजे,
ऐकून घेणारा हा बोलणाऱ्यापेक्षा मोठा असतो..!
कोणासोबतही असे वागू नका
की तो तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही
मन खुप मोठं पाहिजे
एखाद्याला क्षमा करण्यासाठी
आणि माफी मागण्यासाठी
स्वतःला कुणा पेक्षा कमी समजू नका
आत्मविश्वास वाढतो
स्वतःला इतरांपेक्षा जास्त समजू नका
त्यात घमंड असतो
जेव्हा लहानांना मोठे होण्याचा गैरसमज होतो,
तेव्हा मोठ्यांनी त्यांच्यासोबत लहान होऊ नये.
जगात असा कोणताही माणूस नाही
ज्याला त्याची प्रत्येक चूक कळते.
एक छोटीशी मदत देखील खुप मोठी गोष्ट असते
ज्यांच्यासाठी ज्यांची वेळ वाईट असते
पैशाचे मूल्य समजून घ्या
खर्च करण्यापूर्वी ते कमावूण पाहा
जेव्हा तुमच्याकडे नसतात
तेव्हां कोणाला तरी मागून पहा
भीतीचा सामना करणे हाच
भीती संपवण्याचा एकमेव मार्ग आहे.
तुमचे दुःख, तुमचा आनंद
कोणाला तुमच्याशी काय
जीवन तुमचे
वेळ असो, पैसा असो किंवा प्रेम असो
ज्याला कोणत्याही गोष्टीची किंमत नसते
एके दिवशी तो त्याच गोष्टींसाठी तरसतो
आकाशात उडण्याची इच्छा असलेले पक्षी
जमिनीचा विचार करत नाहीत.
काय हरवले आहे याचा विचार करू नका
त्याच ठिकाणाहून सुरुवात करा
जिथून तुम्ही चालायला सुरुवात केली होती
प्रत्येकाला काही ना काही समस्या असतेच,
पण काही जण उघडपणे रडतात.
काही जण लपून रडतात.
ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो
त्यानेही आपल्यावर विश्वास ठेवावा हे आवश्यक नाही
आणि आपण कधीही कोणावरही असे करायला लावू शकत नाही.
शिक्षा विसरू नका,
काल विसरू नका,
थोडे जगा,
थोडे मरा.
जो तुमच्यावर दुःखी असू शकतो
तो तुमच्यावर प्रेम करू शकत नाही
जो तुमच्या दुःखाने दुःखी होतो तो
तो तुमच्यावर प्रेम करतो
आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणीही तुमच्यावर
प्रेम करू शकत नाही
जुलूम करणारा भित्रा असतो
जो दुःख सहन करतो तोही भित्रा असतो
आणि जो पाहतो तोही भित्रा असतो
प्रत्येक सकाळ ही जीवन जगण्याची संधी असते
चुकीची मैत्री, चुकीचे नातेसंबंध
आणि चुकीचे लोक तुम्हाला फक्त अपमान
आणि हानी पोहोचवू शकतात.
शरीर आणि मनाची शुद्धता म्हणजे आनंद!
जो माणूस पाप करतो तो जिवंत असतानाही
मृतासारखा असतो!
जीवन जगणे कठीण नाही
पण ते समजून घेणे खूप कठीण आहे
द्वेष, मत्सर, लोभ आणि अपेक्षा यांच्यामुळे
माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही
ज्याला विचार करण्याचे
आणि भावना व्यक्त करण्याचे
स्वातंत्र्य मिळत नाही
तो देखील कैदी असतो,
मुक्त नाही
शिष्टाचार आणि शिस्तीचा अभाव
कर्तव्यांपासून दूर जाणे
दुसऱ्या माणसाचे नुकसान करते
प्रत्येकजण वेगळा असतो
प्रत्येकजण कलाकार असतो
कोणीही कोणापेक्षा कमी नाही
प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतो
खूप तहान लागल्यावर पाणी प्या
खूप भूक लागल्यावर अन्न खा
चांगल्या आरोग्याचे रहस्य
खूप झोप लागल्यावर झोपा
एक महान व्यक्ती तो असतो
ज्याचा सर्वांनी आदर केला
सर्वात महान व्यक्ती तो असतो
जो सर्वांचा आदर करतो
सर्वांवर प्रेम करा
सर्वांशी दयाळूपणे वागा
शत्रू जर नतमस्तक झाला तर
त्यालाही माफ करा
पुन्हा एकदा प्रयत्न करणे
हा जीवनातील अडचणींवर उपाय आहे
आयुष्यात मिळवलेली सर्वात मोठी संपत्ती
संकटाच्या वेळी तुमच्यासोबत राहणारा मित्र असतो
व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याच्या चेहऱ्यावरून
आणि डोळ्यांवरून कळते
शब्द, शब्दांचा लहरीपणा
आणि स्वरात लपलेल्या भावना सांगतात की तो कसा आहे
खूप दूर जाणे सोपे आहे.
स्वतःहा पर्यंत पोहोचण्यापेक्षा
व्यक्तीचे चांगले दिवस सांगतात
त्याच्या किती लोक जवळ आहेत
वाईट दिवस सांगतात की त्याचे आपले कोण आहे
आनंदी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाची कदर करत नाही
दृष्टी आणि हेतू स्पष्ट असले पाहिजेत
व्यक्तीने दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये
आणि स्वतःची प्रशंसा करू नये
-parshu…



